स्वप्नील जोशी आणि संदीप पाठक यांच्या दुनियादारीचा ‘मोगरा फुलला’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2019
Total Views |


जीसिम्सनिर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित मोगरा फुललाया मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नील जोशीच्या मित्राची भूमिका चतुरस्र अभिनेता संदीप पाठक साकारत आहे. या चित्रपटात तो सॉफ्टवेअर व्यावसायिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मोगरा फुलला१४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे सुनील कुलकर्णीच्या मित्राची भूमिका संदीप पाठक साकारत आहे. सोपं काम अवघड करणारे मित्र कठीण असतात... या टॅगलाइनसह नुकतेच एक पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रकाशित केले आहे. त्यात स्वप्नील आणि चित्रपटातील त्याचा मित्र संदीप पाठक यांचा वेगळाच लुक यामध्ये बघायला मिळत आहे. या दोघांची केमिस्ट्री यातून व्यक्त होत असून, त्यांच्यातील मैत्रीचा पोत त्यातून अधोरेखित होत आहे.

 

प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी मोगरा फुललाच्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट गाजले आहेत. त्यांमध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. मोगरा फुललाला या चित्रपटाला त्यांनी दिलेला स्वतःचा असा वेगळा टचपाहण्यास प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@