अरिजित सिंहबद्दलच्या खास गोष्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2019
Total Views |


 

आपल्या सुमधुर आवाजानी रसिकांना भुरळ घालणाऱ्या आपल्याला लाडक्या अरिजित सिंहचा आज जन्मदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घडामोडी ज्या कदाचित आपल्याला माहित नसतील. अरिजित सिंहचा जन्म २५ एप्रिल १९८७ साली पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील छोट्याशा गावी झाला. अल्पवयातच गाण्याची आवड निर्माण झाली आणि तेव्हाच त्याच्या सांगीतिक प्रवासाला सुरुवात झाली. त्याच्या जन्मदिनानिमित्त जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या काही गमतीदार गोष्टी.

१. २००५ साली आयोजित करण्यात आलेल्या फेम गुरुकुल या रिऍलिटी शोमधून त्याच्या संगीतातील व्यवसायिक कारकिर्दीची सुरुवात झाली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतकी प्रसिद्धी प्राप्त होऊन देखील त्याच्याकडे अजूनही स्वतःची कार नाही.
 


२. हाय स्कुल म्युसिकल २ मधील 'ऑल फॉर वन' हे आरिजीतचे पहिलेच गाणे शंकर एहसान लॉय या प्रसिद्ध संगीतकारांनी संगीतबद्द केले होते.

३. अरिजितने शास्त्रीय संगीताचे धडे राजेंद्र प्रसाद हर्जारी
, तबल्याचे शिक्षण धीरेंद्र प्रसाद हर्जारी आणि सुगम, बंगाली आणि लोकसंगीताचे शिक्षण वीरेंद्र प्रसाद हर्जारी यांच्याकडून घेतले आहे.

४. अरिजित सिंहला सायकलिंग
, फोटोग्राफी, बंगाली पुस्तके आणि लघु कथा यांमध्ये प्रचंड रस आहे.

५. गुलाम अली
, जगजीत सिंग आणि मेहेंदी हसन हे अरिजितचे आवडते गायक आहेत.

६. अरिजीतने मर्डर २ चित्रपटातील
'फिर मोहब्बत' या गाण्याने हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.

७. अरिजितने त्याची बालमैत्रीण कोयल रॉयशी २०१४ साली लग्न केले होते. रूपरेखा बॅनर्जी ही त्याची दुसरी पत्नी आहे.

८. अरिजित सिंहला अत्तापर्यंत ३ फिल्मफेअर अवॊर्ड मिळाले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@