पंचांची करामत : जेव्हा चालू सामन्यातच बॉल हरवतो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2019
Total Views |


 


बेंगळुरू : क्रिकेटचा सामना आणि पंचांच्या चुका हे समीकरण यावेळी आयपीएल २०१९च्या मोसमात अनेक वेळा पाहायला मिळाले. असाच काहीसा प्रकार बुधवारी किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर बेंगळुरू यांच्या सामान्यदरम्यानही घडला. बेंगळुरूच्या डावातील १३वे षटक संपल्यानंतर 'स्ट्रेटजिक टाइम आउट' दरम्यान पंच शम्सुद्दीन बॉल खिशातच ठेवून विसरून गेले .त्यामुळे ऐन रंगात आलेल्या सामना काही काळासाठी थांबला. मैदानात सर्वांमध्ये बॉल नक्की गेला कुठे? यावरून सगळा गोंधळ उडाला.

 

बेंगळुरू संघाने १३ वे षटक खेळून झाल्यानंतर अडीच मिनिटांच्या ब्रेकनंतर डाव पुन्हा सुरू झाला. पंजाबचा गोलंदाज अंकित राजपूत मैदानात उतरला आणि त्याने पंच शम्सुद्दीन यांच्याकडे बॉलची मागणी केली. मात्र, त्यांनी पंजाबचा कर्णधार आर. अश्विनकडे पाहिले. त्यानेही खुणेने बॉल माझ्याकडे नसल्याचे सांगितले. त्यानंतर मैदानात सर्वच खेळाडूंनी बॉलचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर पंच नवा बॉल घेऊन आले आणि खेळ सुरू झाला. दरम्यान, टेलिव्हीजन रिप्लेमध्ये बॉल शम्सुद्दीन यांनी बॉल खिशात ठेवल्याचे लक्षात आले आणि मैदानात एकच हशा पिकला.

 

पंचांचा हा सावळा गोधळ काही नवीन नाही. परंतु, याबाबतीत सामान्य प्रेक्षकांचे मात्र फार चांगले मनोरंजन झाले. याआधीदेखील पंचांच्या चुकीच्या निर्णयांमुळे अनेकवेळा सामन्यामध्ये व्यत्यय आला आहे. 'आयपीएल २०१९' हे बहुदा पंचांच्या अशाच कारनाम्यांमुळे ओळखला जाईल. पंचांच्या चुकीच्या हावभावामुळे एरवी शांत राहणाऱ्या धोनीलाही मैदानात यावे लागले होते. अर्थात नियमाप्रमाणे ते चुकीचे असल्याने त्याला त्याचा दंडदेखील भरावा लागला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@