धक्कादायक : उजनी धरणाची पाणीपातळी खालावली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2019
Total Views |



माढा : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस झपाट्याने खालावत चालली आहे. अपुऱ्या नियोजनाअभावी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने हा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर महिन्यात ११० टक्के भरलेले धरण सात महिन्यांत ऋण ३२.५३ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. यामुळे पाणी कपातीच्या संकटाला सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील गावे, शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागणार. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोल्यासह अनेक शहरांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.

 

दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले आहे. रोज एक टक्का उजनी धरणातील पाणी कमी होत असून, या पाण्यातून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जाणार आहे. जिल्ह्यात चालू वर्षी पाऊस कमी पडल्याने भूजल पातळी खूप कमी झाली आहे. विहिरी व बोअरवेलनी तर मार्च महिन्यातच तळ गाठला आहे. शेतकºयांना पाण्याचे नियोजन तर अत्यंत काटकसरीने करावे लागणार आहे. उजनीची पाणीपातळी ४८८.१८० मीटर आहे. एकूण पाणीसाठा १३०९.२८ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा ऋण ४९३.५३ दलघमी आहे. एकूण टीएमसी ४६.२३ आहे. उपयुक्त टीएमसी ऋण १७.४३ आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीत पाणीसाठा प्लस २१.८३ टक्के होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@