९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपीचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2019
Total Views |


 


नागपूर : १९९३ साली मुंबई येथे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी अब्दुल गनी तुर्क याचा मृत्यू झाला आहे. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर २०१२ येरवडा कारागृहातून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवले होते. ६ महिन्यांपूर्वी त्याला अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर तो अनेक दिवस शासकीय रुग्णालयात भरती होता. बराच काळ उपचार घेतल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले होते.

 

गेल्या दोन दिवसांपासून अब्दुल गणीची प्रकृती पुन्हा ढासळत असल्या कारणाने त्याला जीएमसी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्यानंतर अब्दुल याला पुन्हा या कारागृहातील रुग्णालयात पाठवले. मात्र, गुरुवारी अब्दुल्लाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला पुन्हा जीएमसीमध्ये भर्ती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कारागृह प्रशासनाने अब्दुल गनी तुर्कच्या मृत्यूची माहीती स्थानिक पोलिसांसह त्याच्या कुटुंबीयांना दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@