दिग्दर्शक रवी जाधव घेऊन आलेत रंपाट पोस्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |

 
 
रवी जाधव दिग्दर्शित रंपाट या चित्रपटाचे ढिंच्याक पोस्टर आज प्रदर्शित झाले आहे. मुन्नी आणि मिथुनचे हे नवीन पोस्टर आपल्या चेहऱ्यावर एक हलकेसे हास्य घेऊन येते. हे रंपाटचे पहिलेच पोस्टर आहे.
 
 
 
 

येत्या १७ मेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनय बेंद्रे आणि काश्मीर परदेशी या दोघांची जोडी आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील गावरान मैना हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते.

 
नटरंग, बालक पालक, टाईमपास, टाइमपास २ अशा प्रसिद्ध कलाकृती बनवल्यामुळे रवी जाधवकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. त्याचा याआधीचा न्यूड हा चित्रपट वादाच्या भवऱ्यात अडकल्यामुळे त्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते. मात्र या चित्रपटात तरी असे आक्षेपार्ह वाटत नसल्यामुळे कोणतीही अडचण येण्याचे कारण वाटत नाही.
 
 
रंपाटच्या आत्तापर्यंत आलेल्या गाण्यांना आणि फोटोसना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटाबद्दल प्रेक्षकांचे काय मत आहे हे या १७ तारखेला कळेल.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@