जॅकलिन नेटफ्लिक्सच्या नव्या सिरीजमध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |

 
हॉटस्टार, अमेझॉन प्राईम, व्हुट, झी ५ सारखेच एक प्रसिद्ध माध्यम म्हणजे नेटफ्लिक्स. या नेटफ्लिक्सवर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सिरीज आणि नेटफ्लिक्सची स्वतःची निर्मिती असलेल्या काही सिरीजचे प्रसारण होत असते. अशीच एक नवी सिरीज लवकरच नेटफ्लिक्सवर सुरु होत आहे. मिसेस सिरीयल किलर असे या सिरीजचे नाव असून यामध्ये ग्लॅमरस स्टार जॅकलिन मुख्य भूमिकेत असणार आहे.
 
 
 
 

सेक्रेड गेम्स, सिलेक्शन डे, द क्राऊन यांसारख्या अनेक सिरीज आत्तापर्यंत नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाल्या. हळूहळू मोठ्या पडद्यावर कामे करणारी कलाकार मंडळी देखील या वेबच्या नव्या प्रयोगाकडे आकर्षित होताना दिसत आहे. सैफ अली खान, राधिका आपटे आणि आता जॅकलिन फर्नांडिस देखील आपल्याला या नव्या सिरीजमध्ये झळकताना दिसणार आहे.

 
 नेटफ्लिक्स सारख्या माध्यमातून वेगळी मानसिकता, विचारधारा, गुणधर्म असलेल्या प्रेक्षकांपर्यंत आता पोहोचणे शक्य झाले आहे. आणि लगेचच मिळणारा प्रतिसाद पडताळून घेणे सुद्धा यामुळे शक्य होत आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@