गोलमाल जुनिअरचा प्रोमो प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |

 

 
गोलमाल हा रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट कार्टून स्वरूपात येत आहे. गोलमाल जुनिअर असे याचे नामकरण करण्यात आले असून याचा पहिला वहिला प्रोमो आज प्रदर्शित झाला आहे. येत्या १३ मेला सोनीक निकलोडिअन या लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेल्या वाहिनीवर हा कार्यक्रम सुरु होणार आहे.
 
 
 
 

या कार्टून गोलमाल जुनिअरच्या प्रोमोमध्ये अजय देवगण, आणि रोहितचा ऍनिमेटेड अवतार पाहायला मिळणार आहे. रोज दुपारी १.३० वाजता हा कार्यक्रम टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या सिरीजमध्ये गोलमालमधील काही कलाकारांपैकी कोणाकोणाची कार्टून कॅरेक्टर्स आता आपल्याला पाहायला मिळतील याची उत्सुकता लहान मुलांमध्ये असणार आहे.

 

आता ही सिरीज जर हिट झाली तर रोहित शेट्टी लहान मुलांवर देखील आपली छाप सोडेल यात शंका नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@