६६ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सार्वजनिक निवडणूक २०१९ नंतर घोषित होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची निवड स्वतंत्र आणि नि:पक्षपणे चित्रपट क्षेत्रातील मान्यवर ज्युरींमार्फत केली जाते. हे पुरस्कार दरवर्षी एप्रिल महिन्यात जाहीर केले जातात.

 

मात्र, यंदा १७ वी लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यातील एक राज्य चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहे. चित्रपट माध्यमाचा कोणा एका पक्षाला होऊ शकणारा लाभ लक्षात घेऊन सर्व पक्षांना समान संधी कायम ठेवण्यासाठी या पुरस्कारांची घोषणा निवडणूका संपन्न होऊन आचारसंहिता संपेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

एखाद्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होणे हा एक बहुमान असल्यामुळे सर्व दिग्दर्शक, कलाकार आणि चित्रपटाशी निगडित सगळ्यांचा यासाठी कस लागतो. आणि म्हणूनच असे चित्रपट निवडताना सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि निर्णय प्रक्रियेला वेळ लागतो. यावेळी मात्र निवडणूक प्रक्रियेमुळे निर्णय जाहीर होण्यास विलंब होत आहे त्यामुळे पुरस्कार प्राप्त चित्रपटांची नावे ऐकण्याची उत्कंठा आणखी थोडे दिवस वाढणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@