'कुली नंबर वन' नव्याने अवतरणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |
 

 

मुंबई : जुडवा २ , सूर्यवंशीनंतर सध्या रिमेकची चालती असतानाच आणखी एक रिमेक आपल्या भेटीस येत आहे. जॅकी भगनानी या कलाकारांनी नुकतेच सोशल मीडियावर हे जाहीर केले आहे. या येऊ घातलेल्या चित्रपटाचे नाव आहे 'कुली नंबर १ ' हो तुम्ही बरोबर वाचले आहे. पूजा फिल्म्सच्या तब्बल २५ वर्षांच्या यशस्वी प्रवास आज पूर्ण झाला त्यानिमित्ताने आज ही घोषणा करण्यात आली आहे.

 
 
 

या कुली नंबर १ च्या नव्या अवतारामध्ये सर्वांचाच लाडका वरून धवन आणि सारा अली खानची जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जुडवा २ नंतर पुन्हा एकदा बाप आणि मुलगा पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता द्विगुणित झाली आहे.

 
 
 

गोविंदा, करिष्मा कपूर कादर खान, शक्ती कपूर यांचा १९९५ साली डेव्हिड धवनने दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे कुली नंबर वन. हा चित्रपट त्या काळी प्रचंड गाजला होता. आता हा कुली प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का हे कळेलच.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@