पुणेकर जगात भारी ! जपानच्या निवडणूकीत योगेंद्र पुराणिक विजयी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |


 


टोकयो : भारतीय वंशाचे ४१ वर्षीय पुणेकर योगेंद्र उर्फ योगी जपानच्या निवडणूकीत जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. योगेंद्र यांनी जपानची राजधानी टोकियो येथील इडोगावा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला होता. त्यासाठी २१ एप्रिल रोजी मतदान झाले. त्यात योगेंद्र यांना सहा हजार ४७७ मते मिळाली आहेत. मराठी माणसाला मिळालेल्या यशाचा डंका सोशल मीडियावर वाजत आहे.

 

पुण्यामधील योगेंद्र पुराणिक यांची सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. १९९७ साली योगी शिक्षणानिमित्त जपानला गेले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जपानच्या आयटी कंपनीमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी बरीच वर्षे जपानमध्ये काम केले. त्यांनी Mizuho बँकेत नोकरी केली. योगेंद्र सध्या माजी बँक कर्मचारी असून नुकतेच त्यांनी जपानमधील इडोगाव मतसंघातून निवडणूक लढवली.

 

जपानमध्ये या विभागात जवळजवळ ४ हजार ५०० भारतीय स्थायिक आहेत. जपामध्ये राहणाऱ्या सर्वाधिक भारतीयांची संख्या जवळपास १० टक्के येथेच असल्याचा फायदा योगींना झाला. त्यामुळेच योगींना येथून विजय मिळवता आला. त्यांना मिळालेली मते ही तेथील २,२५,६६१ मतांमध्ये पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक मते ठरली आहेत.


जपानमध्ये २०११ मध्ये भूकंप आल्यानंतर केवळ समाजकार्यात न राहता राजकारणात सक्रीय सहभाग घेण्याचा निर्धार योगी यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. दहा वर्षांपासून योगी
कॉन्सीट्यूएंट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ जपान’ (CDP) या पक्षामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यातूनच अनेकांची मने जिंकली. या जाहिरनाम्यामध्ये योगेंद्र यांनी व्यावसायिक शिक्षण आणि प्रत्येक मुलाला सरकारी शाळेत शिक्षण मिळावे, अशा अनेक मुद्दांचा समावेश केला होता. हे मुद्दे जपानमधील नागरिकांसाठी फार महत्वाचे असल्याचे योगेंद्र यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@