दोनशे आणि पाचशेच्या नव्या नोटा येणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |
 



मुंबई : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार आता लवकरच पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोटा चलनात येणार आहेत. या दोन नव्या नोटा महात्मा गांधी यांच्या सिरीज अंतर्गत आणण्यात येणार आहेत. या नोटा जुन्या नोटांपेक्षा वेगळ्या असतील, त्यावर आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्याऐवजी सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे.

 

२०१६ नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. त्यानंतर शंभर, दोनशे, पन्नास आणि दहा रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. त्यातील जुन्या नोटाही चलनात कायम आहेत. आता पाचशे आणि दोनशे रुपयांच्या नोटा चलनात आल्यानंतर दोनशे रुपयांची जूनी नोटही चलनात कायम राहणार असल्याचे आरबीआयने सांगितले आहे. नव्या नोटांच्या रचनेमध्ये फारसा फरक असणार नाही. मात्र, या नोटा गांधी सिरीजप्रमाणेच असणार आहेत. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बॅंकेने शंभर रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आणल्या होत्या. यावर शक्तीकांत दास यांची स्वाक्षरी आहे. ही नोट चलनात आल्यानंतर आरबीआयने जुन्या नोटा बाद केलेल्या नाहीत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@