बाजारात तेजी परतली : सेन्सेक्स ४८९ अंशांनी वधारला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |


मुंबई सलग दोन दिवस गडगडलेला मुंबई भांडवली बाजाराच्या निर्देशांकाने आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी ४८९ अंशांनी वधारत ३९ हजारांचा टप्पा पार केला. दिवसअखेर तो ३९ हजार ५४ अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दीडशे अंशांनी वधारत ११ हजार ७२६ अंशांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या दरांतील घसरणीमुळे बाजारात तेजी दिसून आली.


बुधवारी कच्च्या तेलाच्या दरांमध्ये अर्धा टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली. गुंतवणूकदारांद्वारे प्रस्थापित सरकार पुन्हा निवडून येईल, असा विश्वास असल्याने खरेदी दिसून आली. मुंबई शेअर बाजारातील ३० पैकी २३ शेअर वधारले. एचसीएल टेक, इंडसइंड बॅंक, ओनजीसी, भारती एअरटेल, एचडीएफसी आणि रिलायन्समध्ये तेजी दिसून आली. याशिवाय फार्मा, बॅंकींग, रियल्टी, मीडिया, आयटी क्षेत्रात खरेदी झाली. तर टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, पावरग्रीड, वेदांता लिमिटेड आदी शेअरमध्ये घसरण झाली.

गेल्या दोन दिवसांपासून घसरत चाललेल्या तेल कंपन्यांच्या शेअरमध्ये आज खरेदी दिसून आली. बीपीसीएल आणि एचपीसीएल कंपन्यांचे शेअर वधारले. अमिरेकेने इराणवर प्रतिबंध लावल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत गेले काही दिवस वाढ होत आहे. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत आज सुधारणा दिसून आली होती.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@