एनसीपीए तर्फे 'वाइल्ड वुमेन फेस्टिवल' चे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |



 

 

अरुंधती सुब्रमण्यम यांची संकल्पना व निर्मिती असलेला वाइल्ड वुमेन फेस्टिवल कविता आणि सादरीकरणाचा दुर्मिळ कार्यक्रम येत्या २७ आणि २८ तारखेला एनसीपीएमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आपल्या उपखंडाला स्त्री तत्वज्ञानाची समृद्ध परंपरा लाभली आहे. स्त्रियांनी स्वत:चा आध्यात्मिक प्रवास सुरु केला आणि अनुकूल जीवन जगण्यास नकार दिला. त्यांनी त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक अडथळ्यांशी, रूढीवादांशी दोन हात करुन स्वत:च्या मनाचे म्हणणे ऐकले आणि कविता आणि गाण्याचा विलक्षण वारसा मागे ठेवला.

 
 
 
 

या स्त्रियांच्या कार्याला वाखाणण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या कवितेतला, प्रामाणिकपणा, उत्साह, तेज तसेच त्यांच्या गाण्यांमधली महत्वाकांक्षा व त्यांच्या आवाहनातले हर्षमय वेड हा उत्सव साजरा करतो. धार्मिक कवितांमधल्या स्त्री आवाजाच्या अनेक मितींचे देखील साजरीकरण केले जात आहे.

 

कार्यक्रमाची माहिती:

शनिवार २७ एप्रिल २०१९ :

१. कार्यक्रम : वाइल्ड वुमेन इन वर्स : लाल देद, अंदल, अक्का महादेवी, मुक्ताबाई, जनाबाई

सादरकर्ते रंजीत होस्कोटे, प्रिया सरुकई छाब्रिया, एच. एस. शिवप्रकाश आणि जेरी पिंटो.

वेळ: सायंकाळी ४-६

स्थळ: गोदरेज डान्स अकादमी थियटर

२. कार्यक्रम: अनपॅकिंग यल्लमा: गॉडेस ऑफ आर्काइव्ह्ज (संगीतमय सादरीकरण आणि संवाद) शिल्पा मुद्बी कोथाकोटा आणि आदित्य कोथाकोटा यांच्या मार्फत सादरीकरण

वेळ: सायंकाळी ६.००-६.४५

स्थळ: गोदरेज डान्स अकादमी थियटर

३. कार्यक्रम: ही इज माय स्लेव: शरीर व त्या पलिकडले

अरुंधती सुब्रमण्यम यांचा परिचयात्मक संवाद आणि कविता वाचन

वेळ: सायंकाळी ७.०० ते ७.३०

स्थळ: एक्सप्रिमेंटल थियटर

४. कार्यक्रम: बेयरहेडेड, आय वॉक द बाजार

बीजद्वारे सादरीकरण: श्रुती विश्वनाथ (गायक), हितेश धुतिया (गिटार), विनायक नेटके (तबला) आणि संजुक्ता वाघ (नृत्य). इंप्रोवायजेशनल नृत्यासोबत पवित्र संगीतमय संध्या

वेळ: सायंकाळी ७.३० -८.३०

स्थळ: एक्सप्रिमेंटल थियटर

 

दिवस २ : रविवार २८ एप्रिल २०१९ :

१. कार्यक्रम: शी ऑफ द फोर नेम्स, मिता वशिष्ट यांचे सादरीकरण

लाल देद यांच्यावरील माहितीपर चित्रपट आणि चर्चा

वेळ: सायंकाळी ४.००-५.३०

स्थळ: गोदरेज डान्स अकादमी थियटर

२. कार्यक्रम: हेली म्हारी: द वुमन्स व्हॉइस इन मायस्टिक पोएट्री शबनम विरमानींद्वारे सादरीकरण

वेळ: सायंकाळी ५.३०- ६.१५

स्थळ: गोदरेज डान्स अकादमी थियटर

३. कार्यक्रम: पिपल से आय एम क्रेझी कल्पिनी कोम्काली यांच्या मार्फत सादरीकरण

वेळ: सायंकाळी ६.३०-७.३०

स्थळ: एक्सप्रिमेंटल थियटर

४. कार्यक्रम: द थ्रेशोल्ड, पल्लवी एमडी आणि बिंदुमालिनी यांचे सादरीकरण

वेळ: रात्री ७.४५- ८.४५

स्थळ: एक्सप्रिमेंटल थियटर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@