जिओची सेवा महागण्याची शक्यता !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |


नवी दिल्ली : टेलिकॉंम क्षेत्रात आपली मक्तेदारी प्रस्थापित करणाऱ्या रिलायन्स जिओला आता गिगाफायबरसाठी नऊ हजार कोटींच्या गुंतवणूकीची आवश्यकता आहे. त्यासाठी जपानची सॉफ्ट बॅंक आणि सौदी अरबची अरामको या संस्था रिलायन्समध्ये गुंतवणूक करण्यास उत्सूक आहेत. मात्र, कंपनी आता ही रक्कम ग्राहकांकडूनही वसुल करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

कंपनी दरवर्षी टॉवर व फायबरवर दरवर्षी नऊ हजार कोटींची आवश्यकता आहे. इनव्हेस्टमेंट बॅंकींग जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार, या आर्थिक वर्षात जिओमध्ये सॉफ्टबॅंक १४ ते २० हजार कोटींची गुंतवणूक करू शकते. रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. रिलायन्स समुहावर तीन हजार कोटींचे कर्ज आहे. या कर्जासह कंपनी नव्या व्यवसायातही उतरू पाहत आहे. जेपी मॉर्गननुसार ५० अब्ज डॉलर्स इतके भांडवल असणाऱ्या जिओने हिस्सेदारी विकल्यास ऑनलाईन रिटेल क्षेत्रातील अलिबाबा आणि अमेझॉनला टक्कर देणारी नवी कंपनी सुरू करण्यासाठी मदत होईल.

 

सौदी अरबमधील अरमको ही कंपनी रिलायन्स पेट्रोकेमिकल क्षेत्रातील २५ टक्के भागिदारी खरेदी करण्यास उत्सूक आहे. हा व्यवहार १० ते १५ अब्ज डॉलर्स इतका असू शकतो. अरबजे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये मुकेश अंबानी यांची भेट घेतली होती. अरमको ही सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@