अबूधाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्याला बिरजू महाराजांची उपस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |

 

 
२९ व्या अबूधाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्याला आजपासून सुरुवात होत आहे. हे पुस्तक प्रदर्शन साहित्य, कला आणि संकृतीचा संगम आहे. प्रसिद्धीप्राप्त गायक जसबीर जस्सी तसेच हरप्रीत सिंह आणि प्रसिद्ध कथक नृत्यकार पंडित बिरजू महाराज भारतीय संस्कृतीतील छटा या प्रदर्शनादरम्यान सादर करणार आहेत. त्याचबरोबर मल्याळम आणि आणि पंजाबी साहित्याशी निगडित पुस्तके देखील या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहेत.
 
 
 
 
 

या मेळाव्यात ५० देशांचे १ हजार प्रेक्षक यात सहभागी झाले आहेत. यावेळी भारत सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या भारतीय दूतावासामध्ये असलेल्या नवदीप सिंग सूरी या भारताच्या राजदूतांनी दिलेल्या माहितीनुसार भारताला मिळालेला हा सन्मान दोन्ही देशातील राजकीय आणि अन्य संबंध अधिक दृश्य करण्यास मदत करेल. भारतातून या पुस्तक प्रदर्शनामध्ये ३० भारतीय सहभागी होणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 
 
या प्रदर्शनाचे औचित्य साधून बिरादयाज्ञनिकद्वारा शांती, सत्य आणि अहिंसेचे प्रतीक असणाऱ्या महात्मा गांधींच्या छायाचित्राचे अरबी संस्करण या पुस्तकाचे उदघाटन देखील यावेळी करण्यात येणार आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@