आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताचे वर्चस्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने मंगळवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. राष्ट्रकुल क्रीडा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता असलेल्या बजरंगने ६५ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या सायात्बेक ओकासोव्हला नमवत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच, बुधवारी महाराष्ट्राचा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू राहुल आवारे याला आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. त्याने दक्षिण कोरियाच्या किमला ९-२ असे हरवले.

 

जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या बजरंगने अंतिम सामन्यात ओकासोवाला १२-७ असे पराभूत केले. बजरंगच्या या सुवर्ण यशानंतर त्याचे गुरू असलेले ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत बजरंगने आतापर्यंत ५ पदके पटकावली आहेत. त्यात २ सुवर्ण, ३ कांस्य आणि १ रौप्य पदकाचा समावेश आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@