अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणुकांच्या कामांची सक्ती नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2019
Total Views |



मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणुकांच्या कामांची सक्ती नाही. त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी न येणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.

 

अंगणवाडी सेविकांची जबाबदारी ही सेवार्थ आहे. त्यांच्यावर लहान मुलांची तसेच कुपोषित बालकांच्या आहाराची, शिक्षणाची जबाबदारी सोपवलेली आहे. ज्यात अनेक काम समाविष्ट असल्याने त्यांच्यावर इतर कोणतीही अतिरिक्त जबाबदारी टाकू नये असे स्पष्ट निर्देशच दिलेले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी २०१९च्या नियमावलीतही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी लावू नये असे स्पष्ट म्हटलेले आहे.

 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाची सक्ती करू नये या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. त्या संबंधी मा. न्यायाधीश श्री अभय ओक व मा. न्यायमूर्ती श्री कर्णिक यांनी निर्णय दिला. महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर निवडणुकीच्या कामाची सक्ती करता कामा नये असे त्यांना आदेश दिले. निवडणुकीचे काम करू न इच्छिणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करता कामा नये. असे ही आदेश मा. न्यायमूर्तींनी दिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@