सत्यजित राय - एक महान कलाकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019
Total Views |


पाथेर पांचाली या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सत्यजित राय यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म कलकत्तामध्ये झाला. त्यांच्या घराण्यात कलात्मक सृजनशीलतेचा वारसा होता. त्यांचे आजोबा उपेंद्रकिशोर राय प्रसिद्ध लेखक, संगीतकार आणि चित्रकार होते. सत्यजित रायांचे वडील सुकुमार राय कवी, लेखक आणि चित्रकार होते. शाळेत असताना राय यांनी हॉलीवूडबद्दल मासिकांमध्ये वाचले आणि तेव्हापासून त्यांना चित्रपटांमध्ये गोडी वाटू लागली.

 

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शांतिनिकेतन येथे पाच वर्षे शिक्षण घेतल्यानंतर इ.स. १९४२ मध्ये राय कोलकात्याला परतले. त्यानंतर त्यांनी एक-दोन ठिकाणी जाहिराती तयार करणे, पुस्तकांची मुखपृष्ठ छापणे अशा प्रकारची कामे केली. त्याच दरम्यान त्याच दरम्यान बिभूतिभूषण बॅनर्जी यांची पाथेर पांचाली ही कादंबरी त्यांच्या वाचनात आली आणि या कथेचा राय यांच्या मनावर बराच प्रभाव पडला. आणि त्यातूनच पाथेर पांचाली या चित्रपटाचा जन्म झाला. परंतु त्यासाठी त्याआधी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अखेर चित्रपट यशस्वी झाला आणि त्याला राष्ट्रपती सुवर्ण पदक आणि राष्ट्रपती रजत पदक याबरोबरच इतर अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले. सत्यजित राय यांनी चित्रपटनिर्मितीबरोबरच विपुल लेखनही केले. त्यांच्या बर्‍याच पटकथा देखील प्रसिद्ध झाल्या आहेत.

 

चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना पद्मश्री, भारतरत्न, ऑस्कर अशा अनेक सर्वोच्च पुरस्कारांनी गौरवण्यात आले. याशिवायही त्यांना युगोस्लाव्हियाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातर्फे डी. लिट. असे अनेक मान सन्मान प्राप्त झाले. फ्रान्स येथील कान चित्रपट महोत्सव यांसहित यांना एकूण ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. अशा या महान लेखक, पटकथालेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शकाला महा MTB तर्फे आदरांजली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@