पुस्तकांच्या आठवणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019
Total Views |

 

 
आज जागतिक पुस्तक दिन. पुस्तक म्हंटलं की आपल्याला आपलं बालपण आठवतं. जेव्हापासून आपण बोलायला सुरुवात केली तेव्हापासूनच आपलं आणि पुस्तकांचं एक अलिखित असं नातं निर्माण झाल होतं....अव्यक्त पण व्यक्त. प्रत्येकजण आपल्यापरीने या पुस्तकांमध्ये काहीतरी शोधत असतो. मग कोणी माहिती, कोणी हलके-फुलके विषय, कोणी कौटुंबिक कथा, जीवनचरित्र, प्रेरणादायी अशी कित्येक प्रकारची पुस्तकं प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार वाचत असतो. वाचाल तर वाचाल या उक्तीनुसार पुस्तकं आपलं आयुष्य अधिक समृद्ध करण्यास मदत करतात.
 
 

पुस्तकांमुळे आपलं बालपण सुखात गेलं. लहानपणी आपल्याला शिकवलेल्या कविता अजूनही आपल्याला आठवत असतीलच. किती छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला खूप व्यापक संदेश दिला जातो मग ती गोष्ट ससा कासवाची का असेना, काहीतरी करण्याची इच्छा आणि जिद्द असलेला माणूस कितीही संकटं आली तरी आयुष्यात यशस्वी होऊ शकतो हा विचार किती साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला मिळाला. अशाच अनेक गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या आहेत.

 
 
त्याचबरोबर चिंटू, चंपक, टिंकल, फास्टर फेणे, डेनिस यांसारखी मासिकं सुद्धा आपल्याला खूप काही शिकवतात. चिंटूची विनोदबुद्धी, चंपक मधील रम्य कथा, फास्टर फेणेच्या साहसी कथा, डेनिसची चतुर आणि हजरजबाबी वृत्ती या सगळ्या गोष्टी कितीही वर्ष उलटली तरी आपल्या मनावर घर करून आहेत.
 
 

तिन्हीसांजेच्या वेळी हातात पुस्तक घेऊन आजी आजोबा त्यांच्या नातवंडांना घेऊन झोपाळ्यावर बसलेले आहेत आणि त्या तांबूस आकाशातून चंद्र जसजसा तशी लहानग्यांच्या पापण्यांवर झोप यायला सुरुवात होते. वाह...किती सुंदर दृश्य आहे नाही का. हेच दृश्य मनात साठवून आपण मोठे होत गेलो. आणि आता पुस्तकांचाच आपल्याला विसर पडत चाललाय. पुस्तकाची जागा आता स्मार्ट फोनने घेतली पण ती मायेची उब मात्र हरवली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@