देवरांना मतदान करा सांगणाऱ्या अंबानींना अशोक चौगुलेंचे खणखणीत पत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019
Total Views |


विश्व हिंदू परिषदेच्या अशोक चौगुले यांचे उद्योगपतींना थेट पश्न

 


मुंबई : दक्षिण मुंबईतील कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे लोकसभा उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठींबा देणाऱ्या उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांना विश्व हिंदू परिषदेच्या विश्व विभागाचे कार्याध्यक्ष अशोक चौगुले यांनी खुले पत्र लिहीत थेट सवाल विचारला आहे.

 

 

चौगुले म्हणाले, "आदरणीय मुकेश अंबानी आणि उदय कोटकजी मी एका गोव्यातील व्यावसायिक कुटूंबातून आलो आहे. त्यासह विश्व हिंदू परिषदेत १९९० पासून कार्यरत आहे. सध्या विश्व विभागाचा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तुम्ही १७ व्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार मिलींद देवरा यांना पाठींबा जाहीर करत त्यांना मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. देवरा यांच्या समर्थनार्थ प्रसारित केलेल्या व्हिडिओनुसार देवरा हे सलग १४ आणि १५ व्या लोकसभा निवडणूकीदरम्यान १० वर्षे एकमेकांना ओळखता उदय कोटक यांनी त्यांचे वडिल मुरली देवरा यांच्यासह कोटक यांचे चांगले संबंध असल्याचा उल्लेखही त्यांनी यात केला आहे.

 

अशोक चौगुले यांनी अंबानी आणि कोटक यांना विचारलेले प्रश्न

 

·  दक्षिण मुंबईतील असा एक वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे जो फक्त त्यांच्या विभागापर्यंत मर्यादीत न राहता संपूर्ण देशाचा विचार करतो. त्यांना अनेक राष्ट्रीय मुद्देही या निवडणूकीत महत्वाचे वाटतात हे तुम्हीही मान्य कराल. देशात कॉंग्रेस प्रचार करताना 'चौकीदार चोर है', अशी घोषणा देतात, हे तुम्हाला तरी पटत आहे का ?

 

·  कॉंग्रेसने १९४७ पासून गरीबी हटावचा नारा दिला आहे. मग आत्तापर्यंत गरीबीची समस्या दूर का झाली नाही, आता देशातील २० टक्के जनतेला ७२ हजार थेट खात्यात अनुदान देणाऱ्या न्याय योजनेचा आधार का घ्यावा लागत आहे ?

 

·  कॉंग्रेस देशद्रोहाचे कलम रद्द करणार, अशी घोषणा देत आहे. काश्मिरमधून सशस्त्र सैन्यदलांना हटवण्याची घोषणा राहुल गांधी करत आहेत ? हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी खेळ तुम्हाला मान्य आहे का ? लेफ्ट. जनरल हुड्डा यांच्या मते सध्या देशाकडे पुरेसे संरक्षण नाही आणि तुम्ही सध्या असलेला काश्मिर घाटातील फौजफाटा हटवण्याच्या गोष्टी तुम्ही मान्य करता का ?

 

·  कॉंग्रेसकडून सध्या राफेलच्या मुद्द्याचे राजकारण केले जात आहे, राहुल गांधी यांच्या आरोपांनुसार ३० हजार कोटींचे कंत्राट अनिल अंबानी यांना देण्यात आले आहे, तुम्हाला हे मान्य आहे का ?

 

·  वरील मुद्द्यांना बगल देत काहीही कारण नसताना केवळ दक्षिण मुंबईतील मुद्दा समोर आणत मिलींद देवरा यांना समर्थन दर्शवत आहात याचे कारण तुम्ही सांगू शकाल का ? ही माहिती तुम्हाला दिल्यानंतर मला असे वाटते कि, आपण एकदा संयुक्त पुरोगामी आघाडीतील सरकारवर नजर टाकू ज्यात देवराजी कधीकाळी मंत्रीदेखील होते, तर त्या काळातील स्थितीबद्दल तुम्ही चिंता व्यक्त कराल आणि पुन्हा कॉंग्रेसचे समर्थन करणार नाही.

 

या पत्राच्या शेवटी मला हे वेगळे सांगायला नको कि, मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांना निवडणून देण्याची विनंती सर्व मतदारांना करणार आहे, मोदी सरकारच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे काम आपल्या देशाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे आहे.

 - अशोक चौगुले
 
 

चौगुले यांनी अंबानी आणि कोटक यांना या प्रश्नांची उत्तरे देण्याची विनंती केली आहे. केवळ दक्षिण मुंबईचा विचार न करता देशातील उद्योगपती म्हणून संपूर्ण देशाचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी या पत्राद्वारे केले आहे. दक्षिण मुंबई हा विकसित विभाग आहे, विकासासाठी महापालिकेतील नगरसेवक आणि आमदारही आहेत. मात्र, देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या राहुल गांधींना मत का द्यावे, असा सवाल त्यांनी थेट या पत्राद्वारे विचारला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@