राज्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला तर अनेक ठिकणी ईव्हीएममध्ये बिघाड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2019
Total Views |



मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी ११ पर्यंत राज्यात सरासरी २१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तिसऱ्या टप्प्यात पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या बारामतीमधून लोकसभेच्या रिंगणात उभे आहेत. तर अहमदनगर व तर माढा लोकसभेची निवडणूक पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे. अहमदनगरमधून राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप तर भाजपकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे हे रिंगणात आहेत. याशिवाय गिरीश बापट, उदयनराजे भोसले, रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 

उमेदवारांचे सहपरिवार मतदान

 

भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला तर भाजप प्रदेश अध्यक्ष व जालन्याचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनीही कुटुंबीयासह मतदान केले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही पुण्यात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तर भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनीही दौंडमध्ये मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवारांसोबत काटेवाडी मतदान केंद्रात आपला हक्क बजावला. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही राळेगण सिद्धी येथे मतदानाचा हक्क बजावला.

 

ईव्हीएममध्ये बिघाडसत्र सुरूच

 

राज्यात तिसऱ्या टप्प्यातही ईव्हीएमचे बिघाडसत्र सुरूच असल्याचे दिसले. कोल्हापूरमधील शुक्रवार पेठेतील ग. गो. जाधव आणि शाहू हायस्कूल या मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. यानंतर मशीन बदलल्यानंतर मतदान पूर्ववत सुरू झाले. तर अहमदनगरमध्येही अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. जामखेड तालुक्यात नान्नज येथे तर कर्जत शहरातील मतदान केंद्र क्रमांक १८५ वर व्हीव्हीपॅट मध्ये तांत्रिक बिघाड दिसून आला आहे. दरम्यान, ईव्हीएममधील बिघाड तातडीने सोडवण्यासाठी अधिकारी प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@