...तर पवार मुख्यमंत्रीही झालेच नसते : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2019
Total Views |



सोलापूर : 'भाजपत प्रवेश केलात तरी रा.स्व. संघाची हाफ चड्डी घालू नका', असा सल्ला शरद पवारांनी विजयसिंह मोहिते पाटलांना दिला. मात्र, पवारांच्या याच वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार समाचार घेतला आहे. विजयसिंह यांचे नाव न घेता पवारांनी टीका केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. 

चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री कसे झालात?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी पवारांना विचारला. रा. स्व. संघात आता फुल पॅण्ट घालतात, पण त्यावेळी पवारांना हाफ पॅण्टवाले कसे चालले, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस कुर्डुवाडी येथे आले होते.


शरद पवार लोकसभेसाठी माढा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी आले होते
, पण त्यांनी माघार घेत मी मॅच खेळणार नाही, तर बारावा गडी म्हणून मॅच पाहणार, अशी भूमिका घेतली. पण ज्याला आम्ही बारावा गडी म्हणूनही खेळायला तयार नव्हतो, अशाला मैदानात उतरवले. खरी टीम कोण आणि नकली कोण? याचा फैसला २३ तारखेलाच होईल, नकली टीमच्या भरवशावर मॅच जिंकू शकत नाही,' अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@