आक्षेपार्ह विधान भोवले; मिलिंद देवरा विरोधात गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2019
Total Views |




मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने देवरा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भुलेश्वर येथील भाषणात त्यांनी जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचे आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून शिवसेनेने देवरा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

 

देवरा यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात सेनेच्या वतीने अ‍ॅड. धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी ८ एप्रिल रोजी देवरांविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. त्यासोबत देवरा यांच्या भाषणाची सीडीही पाठवण्यात आली होती. या भाषणाच्या क्लिपनुसार देवरांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसून येत असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले होते.

 

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी भादंवि १७१ आणि दोन समुदायांमध्ये निवडणूक काळात तेढ निर्माण केल्याबद्दल भादंवि १२५ या कलमांनुसार एल टी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@