काका, टोपीत गुंतू नका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2019   
Total Views |



त्यांनी संघाची काळी टोपी आणि हाफ पँट घालू नये.” नेहमीच व्हाईट कॉलर कपडे घालून जातीयतेची काळाकांडी करणाऱ्या त्या अजाणत्याने आपली इच्छा व्यक्त केली. काळ्या टोपीचा, त्या हाफ पँटचा त्यांना इतका संताप का? माणसाला जे मिळू शकत नाही, त्याचाच राग येतो हे उघड. कोल्ह्याला द्राक्षे आंबटच असतात. ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ म्हणत कुणी निंदा कुणी वंदा, त्याचे काही सोयरसुतक न बाळगता देशासाठी, समाजासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्यांचा पोषाख. तो पोषाख सगळ्यांनाच सोईचा नसतो. त्याग, बलिदान आणि राष्ट्रप्रेम या भावना इतक्या किमती आहेत की, सत्तेचे राजकारण ज्यांचा श्वास आहे ते या गोष्टींची अनुभूती स्वप्नातही घेऊ शकत नाहीत. मात्र, काळी टोपी आणि हाफ पँट घालणाऱ्यांच्या या गोष्टी रक्ताचा प्राण बनून जातात. ते तसे सगळ्यांच्याच रक्तात भिनत नाही. शाखा, संघ आणि संबंधितांवर आगपाखड करून किंवा त्यांच्यासारखे काहीच जमत नाही म्हणून त्यांची कुचेष्टा करून काही साध्य होणार नाही, हे आतापर्यंत बहुतेकांना कळून चुकले आहे. पण तरीही आपले अस्तित्व दर्शविण्यासाठी काही लोक अज्ञान प्रकट करत असतात. अर्थात त्यांचे वय, राजकारणातील (सत्तेच्या साठमारीतले) योगदान लक्षणीय आहे. तरीही संघाच्या पोषाखाबद्दल टिप्पणी करताना दुसऱ्यांच्या पोराचे लाड करत नाही, असे म्हणणारे काका विसरले की, संघात फुल पँट घालण्याची मुभा आहे. काकांनी त्यांच्या नावडत्या संघटनेच्या पोषाखाबद्दल बोलताना त्या पोषाखाची पूर्ण माहिती तरी काढावी ना? ती तशी माहिती काढली असती तर त्यांना कळले असते की, काळी टोपी आणि हाफ पँट घालत रा. स्व. संघाचा स्वयंसेवक होणे हे जातीपातीचे विषारी राजकारण करण्यापेक्षा वेगळे आहे आणि सतीचे वाण आहे. तसेही काकांचा काळ मागे पडला आहे. त्यांना शाखेतच संघ दिसतो. आज सत्य तर हे आहे की, देशात प्रत्येक देशप्रेमी आणि नीतिमान व्यक्ती संघाचेच प्रतिनिधीत्व करत असते. मग ते शाखेत जावोत वा न जावोत, काळी टोपी घालोत वा न घालोत. कारण सकारात्मक परिवर्तनाची साक्ष घेतच आज संघाची नीती प्रकाशमान आहे. या पार्श्वभूमीवर काका, तुम्ही अजूनही नथुराम वगैरेंचे नाव घेत १९५० च्या दशकात वावरता. आता २०१९ साल आहे काका. टोपीमध्ये गुंतू नका...!

 

लावा रे, तो व्हिडिओ!

 

लावा... लावा रे, तो व्हिडिओ!, असे म्हणत मी व्हिडिओ लावतो आणि माझ्या सभा मी गाजवतो. माझ्या सभांना उत्तर प्रदेशामध्येही मागणी आहे. कोणे एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात झपाट्याने उदय पावलेला आणि तितक्याच झपाट्याने अस्ताला लागलेल्या राज ठाकरेंचे म्हणणे. अर्थात उरलो फक्त भाषणापुरता... हे काही महिन्यांपूर्वीचे त्यांचे कर्तृत्व होते. आता तर उरलो फक्त व्हिडिओपुरता, ही त्यांची ओळख झाली आहे. लोकसभेला एकही उमेदवार न देता या व्हिडिओबहाद्दर नेत्याला आता ओढ आहे म्हणे विधानसभेची. कसे काय बुवा? कारण कितीवेळा सांगावे की, कधी सेना, कधी भाजप, कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादीसाठी मत मागता मागता या नेत्याचे मन आपल्या स्वतःच्या पक्षासाठी निष्ठावान राहिले असेल का? जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा? असे काही लोक म्हणतात, तर काही लोक म्हणतात, दुसऱ्यांच्या काकांपेक्षा स्वतःच्या काकांशी निष्ठा ठेवली असती तर आज जाऊ तो जाऊ कहाँ? म्हणण्याची वेळ आली नसती. तरी बरे, आता ज्या काकांचा पुळका आला आहे, ते काका तर खुलेआम म्हणतात की, आम्ही दुसऱ्यांच्या पोरांचे लाड करत नाहीत. मग बळेबळे काकांकडे आशेने पाहणारा हा पुतण्या तर कितीही झाला तरी दूरचाच. कारण नव्या काकांना स्वतःला ‘टग्या’ म्हणण्यात भूषण मानणारा एक आपला पुतण्या आहेच. असो, नात्यापात्याच्या भावनिक गुंत्यात गुंतणारे ना घड्याळवाले काका आहेत ना इंजिनवाले पुतणे आहेत. इथे दोघांनाही बांधणारा बंध आहे केवळ आणि केवळ सत्तेचा. त्याहीपेक्षा मोठा बंध आहे, नरेंद्र मोदी नावाच्या पंतप्रधानांचा. केवळ आणि केवळ या एका व्यक्तीच्या विरोधात आणि त्या अनुषंगाने सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कृत्रिम काका आणि त्यांचे कृत्रिम पुतणे कृत्रिमपणे एकमेकांसोबत आहेत. यामध्ये सगळ्यात हास्यास्पद आहे, लावा रे, व्हिडिओ. आपले स्वतःचे विचार काय, मत काय, भूमिका काय, भविष्य काय यावर शून्य अभिव्यक्ती. मात्र, दुसरा काय बोलला, केव्हा बोलला याची पांचट चिकित्सा करण्यात हे महाशय गुरफटून गेले आहेत. मात्र, जनता म्हणते आहे, दुसऱ्यांचे व्हिडिओ लावण्यापेक्षा ‘कोण होतास तू, काय झालास तू’च्या प्रवासापासून ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’चा व्हिडिओ पुतण्याने पाहायला हवा. लावा रे, तो व्हिडिओ!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@