सहा निवडणूक अधिकाऱ्यांचे निलंबन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2019
Total Views |


निवडणुकीच्या कामात हलगर्जी केल्याचा आरोप

 

भूवनेश्वर : निवडणुकीच्या कामात हलगर्जी केल्याप्रकरणी ओडिशा येथील बरगढ येथील सहा निवडणूक अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. बरगढच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या सहा अधिकाऱ्यांचे कामात हलगर्जी केल्याने निलंबन केले आहे. उमाशंकर पनग्राय, रोशन सेठी, प्रियबत्र साहू, प्रशांत सेठी, उमाशंकर पनग्राय, आणि प्रदीप प्रधान असे निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

 

२१ लोकसभा आणि १४७ विधानसभा सदस्यांसाठी ओडिशामध्ये चार टप्प्यामध्ये एकत्रित मतदान होत आहे. यातील १८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या. यावेळी काही ठिकाणी मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने बरगढच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या सहा अधिकाऱ्यांचे निलंबन केले.

 

दरम्यान, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकामध्ये काही क्षेत्रांना संवेदनशील मतदान क्षेत्रे घोषित करण्यात यावेत व त्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा बलांची नेमणूक करण्यात यावी असे पत्र भाजपने निवडणूक आयोगाला लिहिले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@