'जेट'च्या कर्मचाऱ्यांना 'स्पाईसजेट'चा हात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2019
Total Views |



मुंबई : बँकांकडून ४०० कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. मात्र आता जेटच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला स्पाईसजेट धावून आले आहे. जेट एअरवेजच्या १०० वैमानिकांसह ५०० कर्मचाऱ्यांना स्पाईसजेटने नोकरी दिली आहे. भविष्यात देखील जेटच्या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची तयारी असल्याचे स्पाईसजेटकडून सांगण्यात आले आहे.

 

"स्पाईसजेटने जेट एअरवेजचे ५०० वैमानिक, २०० तांत्रिक कर्मचारी आणि इतरांना नोकऱ्या दिल्या आहेत. आम्ही कंपनीचा विस्तार करत आहोत. दुर्दैवाने जेट एअरवेज कंपनी बंद झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना नोकरीत प्राधान्य देत आहोत." अशी माहिती स्पाईसजेटचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी माहिती दिली. स्पाईसजेट कंपनी येत्या १५ दिवसांत नवी २७ विमाने घेणार असल्याची त्यांनी माहिती दिली. स्पाईसजेटचा देशातील विमान वाहतूक क्षेत्राच्या बाजारपेठेत १३.६ टक्के हिसा आहे. स्पाईसजेटकडे सध्या बोईंग ७३७ एस हे ४८ , बॉम्बार्डियर क्यू ४०० हे २७, एस आणि बी ७३७ हे एक अशी विमाने आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@