देशरक्षणासाठी नरेंद्र मोदींनाच करा मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : देशाच्या अखंडता, सुरक्षा, स्वाभिमान, सार्वभौमत्व, सांप्रदायिक सद्भाव, सर्वांगीण विकासासाठी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करण्याचे आवाहन देशभरातील ४०० हून अधिक साहित्यिकांनी केले आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नरेंद्र मोदी व भाजपविरोधात विरोधकांसह कला, साहित्य क्षेत्रातूनही विरोधाचे आवाज उठले आहेत. सुरुवातीला ६०० पेक्षा अधिक कलाकारांनी आणि नंतर २०० लेखकांनी मोदींविरोधात मतदानाचे आवाहन केले होते. तद्नंतर मात्र ९०० हून अधिक कलाकार आणि १०९ तामिळ बुद्धिजीवींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन जाहीर केले होते. आता आणखी ४०० साहित्यिकांनी पुढे येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे.

 

एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, भारतीय साहित्य संघटनेच्या नावाखाली एकत्र आलेल्या साहित्यिकांनी म्हटले की, भारतीय लोकशाहीत संविधानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच आम्ही सर्व साहित्यिक आवाहन करतो की, आपले बहुमूल्य मत नरेंद्र मोदींना द्यावे. आवाहन करणार्‍या साहित्यिकांत नरेंद्र कोहली, चित्रा मुद्गल, सूर्यकांत बाली यांच्यासह ४०० साहित्यिकांचा समावेश असून नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात देशाची प्रतिष्ठा वाढवली, राष्ट्रीय सुरक्षेबद्दल कटिबद्धता दाखवली आणि देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा प्रवाहित केली, असे यावेळी साहित्यिकांनी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@