एनआयएचे वर्धा आणि हैद्राबादमध्ये छापे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2019
Total Views |




वर्धा : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने आज सकाळी महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात काही ठिकाणी छापे टाकले. इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली.

 

तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे तीन व महाराष्ट्रातील एका ठिकाणी एनआयएच्या पथकाने छापे मारले आहेत. आयसिसशी संबंध असल्याची माहिती मिळाल्यानेच एनआयएने या ठिकाणी छापे मारले आहेत. या चारही ठिकाणाची झाडाझडती घेतली गेली असून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@