पाकची आर्थिक स्थिती बिकट : पाच वर्षात सर्वाधिक महागाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2019
Total Views |




इस्लामाबाद
: भारताने चोहोबाजूंनी आर्थिक नाड्या आवळ्यानंतर आता पाकिस्तानची अवस्था आणखी बिकट होत चालली आहे. आधीच आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान बिकट अवस्थेत सापडला आहे. रोजच्या खर्चासाठी पैसाच शिल्लक नसल्याने जनतेच्या समस्या वाढत चालल्या आहेत. पाकिस्तानचा महागाई दर गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक आहे. मार्चमध्ये तो ९.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय बॅंकेनेही व्याजदरात वाढ केली असून व्याजदर १०.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१९ मध्ये महागाई दर ९.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. खनिज तेलाच्या किमतीतील वाढीचा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. पाकिस्तानात गेल्या तीन महिन्यांपासून ताज्या भाज्या, फळे, मांस यांच्या किमतीत सतत वाढ होत आहे. जुलै ते मार्च या कालावधीत महागाई ६.९७ टक्क्यांनी वाढल्याचे आकडेवारी सांगते.

पाक सरकारने गतवर्षात महागाई दर ९ टक्क्यांवर मर्यादीत ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र सतत होत असलेल्या महागाईने पाकचे कंबरडे मोडले आहे. २०१७-१८ मध्ये पाकिस्तानात महागाईचा दर ३.९२ टक्के होता. तर २०१६-१७ मध्ये पाकिस्तानात महागाई दर ४.१६ टक्के होता. चलनमुल्यातील घसरण, खनिज तेलदर वाढ यामुळे पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढ केली. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने व्याज दर अर्धा टक्क्यांनी वाढवले आहे. आताचे व्याजदर १०.७५ टक्के आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@