काँग्रेसने दिला 'हम निभाएंगे'चा नारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2019
Total Views |




काँग्रेसचा जन आवाजजाहीरनामा प्रसिद्ध


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. 'हम निभाएंगे' हे काँग्रेसचे घोषवाक्य असून यात काँग्रेस न्याय योजना, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बजेट, तरुणांना रोजगार, गरिबांसाठी किमान उत्पन्नाची हमी अशा अनेक घोषणा केल्या आहेत. काँग्रेसने आपल्या या जाहीरनाम्याला जन आवाजअसे नाव दिले आहे.

 

काँग्रेस सत्तेत आल्यास मनरेगा योजनेअंतर्गत १०० ऐवजी १५० दिवसांचा रोजगार, १० लाख तरुणांना ग्रामपंचायतीत नोकऱ्या, शिक्षणावर जीडीपीच्या ६ टक्के खर्च करणार अशा आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. जाहीरनाम्यात आम्ही कोणतीही खोटी घोषणा केली नसल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितले. यावेळी सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@