सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा डाव : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2019
Total Views |


काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून अनेक लोकप्रिय घोषणांची खैरात केली आहे. सोबतच काही गंभीर मुद्द्यांचाही काँग्रेसने विचार केला आहे. त्यात भारतीय लष्करासाठी ‘अफ्स्पा’ कायदा रद्द करण्याचेही आश्वासन देण्यात आले. काँग्रेसच्या या घोषणेवरून भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. शाह म्हणाले की, “मी राहुल गांधींना विचारतो की, जे सैनिक देशाच्या सीमेवर लढत आहेत. त्यांना तुम्हाला ताकद द्यायची आहे की, त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करायचे आहे?”

तुकडे तुकडे गँगसोबत बसून लिहिलेला जाहीरनामा - जेटली


राहुल गांधी यांनी देशाचे तुकडे करू पाहणार्‍या गँगसोबत बसून या जाहीरनाम्यातली आश्वासने लिहिली आहेत, असे वाटते,” अशा शब्दांत ठणकावत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, “काँग्रेसचा जाहीरनामा देश तोडणारा आहे, त्यांनी दिलेली आश्वासने देशासाठी घातक ठरू शकतात. देशद्रोहाच्या गुन्ह्याचे कलम रद्द करण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात आहे. देशद्रोह हा काँग्रेसला गंभीर गुन्हा वाटत नाही का? जम्मू-काश्मीरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती परिस्थिती संपुष्टात येण्याऐवजी ती वाढवण्याचा विचार काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसत आहे. या जाहीरनाम्यात काश्मिरी पंडितांचा उल्लेखही नाही. काँग्रेसने जी आश्वासने दिली आहेत, ती देशासाठी घातक आहेत. देशाचे विभाजन होईल, अशा अनेक बाबी या जाहीरनाम्यात मांडण्यात आल्या आहेत.”

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@