राहुल पंतप्रधान झाल्यास देशद्रोह्यांची मजाच मजा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2019
Total Views |


देशद्रोहाचे कलम रद्द करण्यावरून काँग्रेसवर टीकेचा भडिमार


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात काँग्रेसने नेहमीप्रमाणे शेतकरी, गरीब, बेरोजगार आणि युवकांसाठी आश्वासनांची खैरात केली आहे. परंतु, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सर्वाधिक हैराण करणारी गोष्ट ठरली ती, देशद्रोहविषयक कलम आणि अफ्स्पा कायदा रद्द करण्याच्या आश्वासनाची! परिणामी काँग्रेसवर भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही टीकेचा भडिमार केला आहे.

 

काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर पूर्वोत्तर राज्यांसह अन्य राज्यांत सुरक्षा बलांना दिलेल्या विशेष अधिकार कायद्याचे म्हणजे अफ्स्पाचे उच्चाटन केले जाईल, फेरविचार केला जाईल,” असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. उल्लेखनीय म्हणजे काँग्रेसने, “अफ्स्पाअंतर्गत सुरक्षा बलांना मिळालेल्या यौन हिंसा व यातनेविरोधात प्रतिरक्षा तरतुदीला हटवले जाईल,” असेही म्हटले. म्हणजेच सुरक्षा बलातले सैनिक लैंगिक हिंसाचार करतात, असेच काँग्रेसला यातून सुचवायचे आहे. सोबतच देशद्रोहाशी संबंधित कलम १२४ ए रद्द केले जाईल, असेही या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

अमित शाह, अरुण जेटली यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र

 

हम निभायेंगेशीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या या जाहीरनाम्यात असेही म्हटले की, “कलम 124 ए चा आतापर्यंत प्रचंड गैरवापर करण्यात आला. जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरमध्ये सशस्त्र बलांच्या तैनातीचा फेरविचार करणे, घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर अधिक सैनिक तैना करणे, काश्मीर खोर्‍यात सैन्य आणि केंद्रीय निमलष्करी बलांची उपस्थिती कमी करणे तथा कायदा-सुव्यवस्था ठेवण्यासाठी जम्मूू-काश्मीर पोलिसांना अधिक जबाबदारी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

 

शिवाय जाहीरनाम्यात असेही म्हटले की, सुरक्षेची आवश्यकता आणि मानवाधिकारांच्या संरक्षणात संतुलनासाठी कायदेशीर तरतुदीत उपयुक्त बदल करण्यात येतील. तसेच काँग्रेस जम्मू-काश्मीरच्या लोकांशी विनाअट चर्चेचे आश्वासन देत असून अशा चर्चेसाठी नागरी समाजातील निवडक तीन वार्ताकारांची नियुक्ती करेल. दरम्यान, काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करतेवेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, पी. चिदंबरम आणि ए. के. अ‍ॅन्टोनी उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@