राहुल गांधींवर का नाराज आहेत प्रियंका चतुर्वेदी ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019
Total Views |



मुंबई : प्रियंका चतुर्वेदी यांनी कॉंग्रेस प्रवक्तेपदासह सर्व पदांचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा सोपवला. बुधवारी त्यांनी पक्षामध्ये होत असलेल्या अपमानजनक वागणुकीबद्दल नारादी व्यक्त केली होती. कॉंग्रेसच्या पत्रकार परिषदेत काही नेत्यांनी त्यांना अपमानजनक वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेसने संबंधित नेत्यांवर कारवाई केली होती. मात्र, त्यांना पुन्हा पक्षात स्थान दिल्याने उत्तर प्रदेश कार्यकारणीच्या व्यवहारामुळे त्या नाराज होत्या.

या व्यतिरीक्त या मागे राजकीय समीकरणेही असल्याचे बोलले जात आहे. प्रियंका लोकसभा निवडणूक लढऊ इच्छित होत्या मात्र त्यांच्या या मागणीकडे कॉंग्रेसने लक्ष दिले नाही. यासह आणखी एक कारण म्हणजे कॉंग्रेसने संजय निरुपम यांना दिलेल्या जागेवरही त्या लोकसभेसाठी इच्छुक होत्या मात्र, दिल्लीत आधीच या जागेसाठी तगादा लावणाऱ्या निरुपम यांच्यासमोर त्यांचे काही चालले नाही. मुंबई कॉंग्रेसने यापूर्वीच प्रिया दत्त आणि उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने चतुर्वेदी यांना कोणत्या जागेवर उमेदवारी द्यायची हा प्रश्न पक्षासमोर होता. मात्र, मथुरा येथे झालेल्या प्रकारामुळे चतुर्वेदी दुखावल्याचे बोलले जात आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@