मुंबईत सिलेंडरचा काळा बाजार ; एकाला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019
Total Views |



मुंबई : सिलेंडर ही मुंबईची गरज आहे. याच गरजेचा फायदा एका भामट्याने घेतला. सिलेंडर ग्राहकांच्या बोगस नावांच्या यादीच्या साहाय्याने दुप्पट किमतीत सिलेंडर विकून एका इसमाने तीन वर्षांत तब्बल २.२ कोटी रुपये कमवले असल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्या व्यक्तीचे नाव कोहलीदास नादर असून तो विजय एजन्सीचा व्यवस्थापक आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोळीदास नादरला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

सायन-कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या कोळीदास नादर या इसमाने हिंदुस्तान पेट्रोलियमची एजन्सी घेतली होती. त्याच्याकडील ग्राहकांच्या यादीत गेल्या काही वर्षांत बदल करण्यात आले नव्हते. जवळपास ३००० ग्राहकांची नावच यादीतून वगळण्यात आली नव्हती. त्यातील बहुतांश ग्राहक मयत होते तर उरलेले तो परिसर सोडून गेले होते. या ग्राहकांच्या नावावर नादर कंपनीकडून सिलेंडर मागवायचा आणि दुप्पट किमतीत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला विकायचा. तो ६७८ रुपयाचे सिलेंडर १२०० रुपयांत विकायचा. या न्यायाने तो एका दिवसांत २०,००० रुपये कमवायचा तर तीन वर्षांत त्याने २ कोटी २० लाख रुपये कमवले होते.

 

यासंबंधातील माहिती मिळताच उप आयुक्त दिलीप सावंत यांच्या टीमने नादरच्या विजय गॅस एजन्सीच्या कार्यालयावर छापा मारला. छाप्यामध्ये ६००० ग्राहकांच्या यादीतील ५० % ग्राहक बोगस असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी नादरला तात्काळ अटक करण्यात आली. तर सिलेंडरचा सप्लायरही नादरला मदत करत होता का याचा तपास पोलीस घेत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@