नारायण राणेंच्या 'अदिश'विरोधात न्यायालयात याचिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019
Total Views |



मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा जुहू येथील 'अदिश' बंगला अनधिकृत असून तो पाडण्यासंदर्भातची याचिका मुंबई उच्च न्यायालयात नुकतीच दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्यामुळे नारायण राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

याचिकाकर्ते प्रदीप भालेकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. सीआरझेड-२ कायद्यानुसार समुद्रापासून ५० मीटरच्या आत कुठल्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. त्यामुळे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून नारायण राणे यांनी जुहू येथे २०११ मध्ये या बंगल्याच्या बांधकामास सुरुवात केली. हे काम २०१२ मध्ये पूर्ण झाले. आता हा ७ मजली बंगला 'अदिश' नावाने ओळखला जातो.

 

दरम्यान, या बंगल्यामुळे नारायण राणे यांनी सीआरझेड-२चे उल्लंघन केल्याचा आरोप करत याचिकाकर्ते प्रदीप भालेकर यांनी याप्रकरणी पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. मात्र, पालिकेकडून याप्रकरणी टोलवाटोलवीची उत्तरे मिळाल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील नितीन सातपुते यांनी दिली आहे. वेगवेगळी आणि टोलवाटोलवीची उत्तरे पालिकेकडून मिळत असल्याने अखेर भालेकर यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@