भारताचा पाकला आणखी एक दणका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : पाकिस्तानशी नियंत्रण रेषेवरून रस्ता मार्गाने होत असलेल्या व्यापार भारताने शुक्रवारपासून बंद करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी काढले. यामार्गे अवैध शस्त्रास्त्रांसह मादक पदार्थ आणि बनावट नोटांची तस्करी केली जात असल्याची माहिती हाती आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला होता. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, नियंत्रण रेषेवरून व्यापाराच्या नावाखाली फुटीरवाद्यांना भडकावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा अवैध मार्गाने पुरवठा केला जात होता.

 

भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल हे निश्चित. तसेच, भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाचा हा एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे. पाकिस्तानकडून या रस्त्याचा वापर शाश्त्राच्या तस्करीसाठी होत होता अशीदेखील माहिती सूत्रांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@