फेसबुककडून झाली आणखी एक मोठी चूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : फेसबुकच्या यूजर्सच्या प्रायव्हसीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. फेसबुकने मे २०१६ पासून आतापर्यंत ‘अजाणतेपणी’ १५ लाख यूजर्सचे ई-मेल कॉन्टॅक्ट्स अपलोड केले आहेत. फेसबुकने सांगितले की, "फेसबुकने मार्चमध्ये पहिल्यांदा साइन-अप करणाऱ्या युजर्सना ई-मेल पासवर्ड वेरिफिकेशन ऑप्शन ऑफर बंद केली होती. अशा काही प्रकरणांमध्ये युजरने अकाउंट तयार केल्यानंतर त्याचे कॉन्टॅक्ट्स फेसबुकवर अपलोड झाले होते."

 

सुमारे १५ लाख युजर्सचे ईमेल कॉन्टॅक्ट अपलोड झाल्याची माहिती फेसबुकने एका वृत्तपत्राला दिली. हे ईमेल्स कोणाशीही शेअर करण्यात आलेले नाहीत. आता ते डिलीट करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती फेसबुकने दिली. ज्या युजर्सचे कॉन्टॅक्ट्स अपलोड झाले आहेत त्यांना फेसबुककडून नोटिफिकेशन पाठवण्यात येणार आहे. ही समस्या आता सोडवण्यात आली असल्याचेही फेसबुकने स्पष्ट केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@