जाता-येता...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019
Total Views |



‘बदलणे’ या प्रक्रियेतून सगळेजणच जातात. या प्रत्येक बदलात आपण बर्‍याच गोष्टी शिकत असतो. बदलती माणसे, बदलते देश, बदलते वारे या सगळ्या प्रवासात माणसांना एक वेगळीच दृष्टी प्राप्त होते. हाच बदल आमूलाग्र आहे. ‘विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर’ या उक्तीसारखे सतत घर बदलण्याचा योग नशिबी आला. मी सीमा कांबळे. कारण, माझे वडील साखर कारखान्यात नोकरीला होते. त्यामुळे सतत घर बदलावे लागत असे. टेम्पोतून घरातील सामानाची ने-आण करत असल्यामुळे ‘टेम्पो’ हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग बनला. टेम्पोवरील रंगीबेरंगी भडक रंगसंगती, त्यावरील वेगवेगळी ठळक आकारातील घोषवाक्ये, ‘हॉर्न ओके,’ ‘आई तुझा आशीर्वाद,’ ‘नमस्कार’ असे नेहमीच रुळणारे शब्द, बाजूची लटकती, त्यामुळे टेम्पो कायम आकर्षित करत राहिले.

 

वेगवेगळ्या वस्तूंनी भरलेले ट्रक व टेम्पो कधी गवताचे भारे, उसाच्या गाड्या, दुधाची पिंपे, तर कधी कोणाचे संसार, कधी शेळ्या-मेंढ्या व माणसे तर चक्क कधी कधी गायी-म्हशी, अगदी दुचाकी वाहनेसुद्धा. मग ‘गुड्स कॅरियर’ या दोन अक्षरांनी माझे मन बांधले गेले. वस्तू कुठलीही असो प्रेम व जिव्हाळा तेवढाच, मग हेच सगळे माझ्या पेंटिंगमध्ये उतरवायचे ठरवले आणि ‘जाता येता’ या शीर्षकाखाली जणू एक चित्रांची शृंखलाच तयार केली.

 

 टेम्पोचा रांगडेपणा, छाया-प्रकाशाचा खेळ, या ट्रकमधील बदलणार्‍या वस्तू ही माझी आवडती स्थाने. या सगळ्याचाच प्रवास माझ्या मनात घर करून राहिला. आता हे प्रवासरुपी प्रदर्शन मी तुम्हाला माझ्या चित्रातून घडवले आहे. याचा तुम्ही सगळ्यांनी नक्की आस्वाद घ्यावा.

सीमा कांबळे यांचे हे चित्र प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरी, हिराजी येथे १५ ते २१ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाहण्यास उपलब्ध आहे.

 

- प्रा. निलीमा जाधव

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@