मुलायम हे खरे मागासवर्गीय नेते!, मायावती यांचे प्रशस्तीपत्रक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2019
Total Views |



चोवीस वर्षानंतर मुलायम आणि मायावती एकाच व्यासपीठावर



मैनपुरी
: मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाच्या झेंड्याखाली उत्तर प्रदेशातील सर्व समाजाच्या लोकांना पक्षाशी जोडले आहे. मुलायम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे खोट्या मागासवर्गीय जातींमधून येत नाहीत. ते जन्मजात मागासवर्गीय नेते आहेत, असे प्रशस्तीपत्रकच मायावती यांनी मुलायम यांना दिले. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे जाहीर सभेत त्या बोलत होत्या. विशेष म्हणजे तब्बल चोवीस वर्षानंतर उत्तर प्रदेशात शुक्रवारी समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह आणि बसपच्या नेत्या मायावती एकाच व्यासपीठावर आल्या.

 

मायावती म्हणाल्या की, देशहितासाठी कधीकधी कठीण निर्णय घ्यावे लागतात. आम्ही घेत्लेल्या निर्णयामुळे देशाच्या जनतेचे भले होणार आहे. देशात सध्या जी परिस्थिती आहे ती बदलायची असेल तर उत्तर प्रदेशमध्ये सप व बसपने एकत्र येणे गरजेचे होते. यासाठी हा निर्णय घेतल्याचे मायावती यांनी सांगितले. मैनपुरीमध्ये सप, बसप या दोन्ही पक्षांची संयुक्त सभा घेत मायावती यांनी मुलायम सिंह यांचा प्रचार केला. यावेळी बोलताना मायावती म्हणाल्या की, मुलायम सिंह हे खरे मागासवर्गीय नेते आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या खोट्या मागासवर्गीय समाजातून आले नाहीत. त्यामुळे मुलायम सिंह यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन मायावती यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

 

अकलूज येथे तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चौकीदार चोर है’ या मोहीमेबाबत बोलताना मी खालच्या जातीचा असल्याने काही व्यक्ती माझ्यावर टीका करतात असे ते म्हणले होते. मला कितीही शिव्या द्या, मी ते सहन करु शकतो. पण देशातील आदिवासी, शोषित आणि मागास वर्गाला चोर म्हटल्यास मी ते सहन करणार नाही असा इशारा विरोधकांना दिला होता. पंतप्रधानांच्या या विधानावर मायावती यांनी शुक्रवारी भाष्य केले. या सभेमध्ये मुलायम सिंह यांनी मायावतींचे आभार मानत सांगितले की, सप-बसप उत्तर प्रदेशात मोठ्या मतांनी जिंकून येईल. आज मायावती आमच्या व्यासपीठावर आल्या. त्यांचे आम्ही स्वागत करतो. मायावती यांचा आदर नेहमीच राखला जाईल. गरजेच्यावेळी मायावती यांनी आम्हाला साथ दिली आहे. मायावती यांच्या येण्याने आम्हाला आनंद झाला आहे. त्यामुळे आम्ही निवडून येऊ असा विश्वास मुलायम यांनी व्यक्त केला.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
@@AUTHORINFO_V1@@