गोलमाल सीरिज आता अॅनिमेशनमध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2019
Total Views |

 

मुंबई : रोहित शेट्टी यांची लोकप्रिय गोलमाल सिरीज आता लहान मुलांच्या भावविश्वातील प्रसिद्ध वाहिनी असलेल्या निकलोडियन या लहान मुलांसाठीच्या अॅनिमेशन स्वरुपात दिसणार आहे. मॅजिक टून, रुद्रा यानंतर निकलोडियन वाहिनीने त्यांचा भारतातच बनलेला धमाल शो सादर केला. निकलोडियनच्या आगामी कार्यक्रमांमध्ये गोलमाल ज्युनिअरची भर करून या वाहिनीने विनोद, धमाल, मनोरंजक व हसवणारे अधिक चांगले, अधिक भव्य कार्यक्रम आणण्याचे आपले वचन पुन्हा एकदा पाळले आहे.

 

गोलमालच्या लोकप्रिय धमाल सिनेमांनी प्रौढांवर जादू केली आणि आता गोलमालची ज्युनिअर गँग लहान मुलांना हसवण्यास सज्ज आहे.

 

गोलमाल ज्युनिअर दोन मस्तीखोर गँग्सना एकत्र आणणार आहे. या दोन्ही गँग्स खट्याळ आहेत, उत्साही आहेत पण एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या आहेत. गोपाल, माधव, लक्ष्मण आणि लकी यांचे ज्युनिअर अवतार लहानग्यांना धमाल हसवण्यास येत आहेत. ऐकूनच मस्त वाटतंय ना? सादर करत आहोत लक्ष्मण, गोपाल, माधव आणि लकीची प्रँक गँग गोलमाल ज्युनिअरमध्ये.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@