आमदाराची हत्या करणारे दोन नक्षली ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील धनिकारका येथे येथील जंगलात जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी) आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यात २ नक्षली ठार झाले आहेत. या नक्षलवाद्यांनी ९ एप्रिल रोजी दंतेवाडा भागात आयईडीचा स्फोट घडवून भाजपचे आमदार भीमा मांडावी यांची हत्या केली होती. या आत्मघाती हल्ल्यानंतर बदल्याची कारवाई म्हणून आज सुरक्षा रक्षकांनी दोन नक्षलींना ठार केले. ही मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

 

डीआरजी यांनी नक्षली विरोधी ऑपरेशन हाती घेतले असून या दरम्यान पहाटे ५.३० वाजता धनिकारका येथील जंगलात चकमक झाली. जिल्हा राखीव गार्ड जेव्हा गस्त घालत होते; तेव्हा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. यावेळी दोन नक्षलींना ठार करून त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून बोअर गन जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती नक्षल विरोधी ऑपरेशनचे उपमहानिरीक्षक सुंदराज पी यांनी दिली.

 

या कारवाई दरम्यान एक नक्षली जखमी झाला. या कारवाईवेळी मारण्यात आलेल्या दोन नक्षलींची ओळख पटली आहे. वर्गीस आणि लिंगा अशी त्यांची नावे असून या दोघांचा ९ एप्रिल रोजी आमदार भीमा मांडावी यांच्यावर केलेल्या हल्ल्यात सहभाग होता. या हल्ल्यात आमदार मांडावी यांच्यासह ४ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता, असे पोलिस अधीक्षक अभिषेक पल्लवा यांनी सांगितले. वर्गीस हा नक्षलवाद्यांच्या मल्कानगिरी भागातील समितीचा सदस्य आहे. तो आयईडी स्फोट घडवून आणण्यात माहिर आहे. तर लिंगा हा काटेकल्याण भागातील समितीचा सदस्य आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@