जगातील प्रभावी १०० लोकांच्या यादीमध्ये ३ भारतीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि अमेरिकेच्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'टाईम' या मासिकाने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये प्रसिद्ध केलेल्या यादीत जगातील सर्वात प्रभावशाली नेते, उद्योजक, कलाकार आणि प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे. यातील १०० जणांच्या यादीमध्ये भारतातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.

 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, भारतात एलजीबीटीयू समुदायांच्या लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी या तीन भारतीयांचा यादीमध्ये समावेश आहे. तर, इतर नावांमध्ये जगभरात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींची नवे आहेत. अमेरिकन टीव्ही एंकर हसन मिन्हझ, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पोप फ्रान्सिस, चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान, प्रसिद्ध गोल्फर टाइगर वुड्स, अमेरिकेचे माजी प्रथम महिला मिशेल ओबामा, अमेरिकन अभिनेत्री लेडी गागा, अबू धाबीचे युवराज मोहम्मद बिन जायद आणि फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग यांचाही यादीत समावेश आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@