शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना मातृशोक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2019
Total Views |



ठाणे : शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची आई गंगुबाई शिंदे यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बिघडलेली होती. त्यांच्यावर ठाण्यामध्येच उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी वागळे इस्टेट स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार असून अंत्ययात्रा एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडी येथील निवासस्थानाहून सकाळी ११ वाजता निघणार आहे.

 

एकनाथ शिंदे हे डहाणु येथे प्रचारात होते. त्यावेळी त्यांना आईच्या निधनाचे वृत्त समजले. त्यानंतर ते तातडीने ठाण्याला आले. त्यांच्या मागे पती संभाजी शिंदे, पुत्र एकनाथ शिंदे, सुभाष शिंदे, प्रकाश शिंदे, एक मुलगी, सून लता शिंदे, अन्य दोन सुना, नातू विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नातवंडे असा परिवार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@