कॉंग्रेसला मोठा दणका : 'चौकीदार चोर हे' जाहीरातीवर बंदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2019
Total Views |



भोपाळ : मध्य प्रदेश निवडणूक आयोगाने काँग्रेसतर्फे केल्या जाणाऱ्या 'चौकीदार चोर है', या जाहीरातीवर बंदी आणली आहे. आता या जाहीरातींचे प्रसारण तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूकांसाठी 'मै भी चौकीदार', अशी मोहीम सुरू केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जाहीराती भाजपविरोधात 'चौकीदार चोर है', अशी मोहीम सुरू केली.

 

मध्य प्रदेश काँग्रेसकडून अशा जाहीराती बनवण्यात आल्या होत्या. यात दोन ऑडीओ आणि १ व्हिडीओ स्वरुपाच्या जाहीरातींचा समावेश आहे. या जाहीरातींतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधण्यात आला. काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या जाहीरातींविरोधात मध्य प्रदेशातील भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. १६ एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील भाजपाचे शिष्टमंडळांने निवडणूक आयुक्तांची भेट घेतली.

 

'चौकीदार चोर है' माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिमा मलिन करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असे या तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने केलेल्या चौकशीनंतर निष्पन्न झाले की, सध्याच्या राजकारणात चौकीदार या शब्दाचा अर्थ भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला गेला आहे. राजकीय जाहीरात करताना कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक आरोप लावू शकत नाही या कारणाने निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या जाहीरातीवर बंदी आणली आहे. त्यासह चौकीदार चोर है या मोहीमेशी निगडीत कोणत्याही प्रचार साहित्याचा वापर काँग्रेसने करु नये असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@