विवेक ओबेरॉयने घेतली रामदेवबाबांची भेट ??

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |


 

 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉय याने आज रामदेवबाबांची भेट घेतली. आता यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण येणार कि काय ? सध्या निवडणुकीचे वारे वाहत असताना प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडली जाते त्यामुळे या भेटीकडे देखील त्याच दृष्टिकोनातून बघितले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
 
 
 

आधीच विवेक ओबेरॉयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटात मुख्य भूमिका साकारल्यामुळे काही लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता आज या भेटीचा फक्त योगाभ्यास इतकाच उद्देश आहे कि आणखी काही हे आपल्याला कळेलच.

 
 काही दिवसांपूर्वी रणवीर शौरीचा मतदान करा असे आवाहन करणारा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्याने मोदी सरकारबद्दल आपले चांगले मत व्यक्त केले आणि लगेचच तो 'मोदी भक्त' आहे अशा चर्चा सुरु झाल्या. आता काय खरे आणि काय खोटे हे लवकरच जगासमोर येईल. कोण कोणाच्या बाजूनी हे बघण्यापेक्षा आपल्या देशाचा विकास कोण करू शकेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@