देशात ८ राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |



नवी दिल्ली : देशात अनेक राज्यांमध्ये गेले काही दिवस अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि नवी दिल्लीत वादळी पाऊस आणि वीज पडून सुमारे ३५ जणांचा मृत्यू आणि ४० जण जखमी झाले आहेत. गुजरात, मध्य प्रदेशात अधिक जीवितहानी झाली असून या ठिकाणी सुमारे २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

 

वादळी पावसासह अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुजरातमधील ३३ पैकी १८ जिल्ह्यांत पाऊस झाला आहे. या ठिकाणी पाऊस आणि वीज पडून झालेल्या घटनांशी संबंधित ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात १० जणांचा मृत्यू झाला आहे. इंदोरमध्ये वीज पडून ३, बदनावर येथे दोघांचा बळी गेला आहे.

 

राजस्थानमध्ये वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. तसेच अनेक ठिकाणांचा वीज पुरवठा ठप्प झाला आहे. येथे ९ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. पश्चिमी चक्रावात (वेस्टर्न डिस्टर्बन्स) सक्रिय झाल्याने पुढील २४ तासांत ताशी ६०-७० किलोमीटर वेगाने वारे वाहून जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात गारपीट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@