गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून त्यांच्या बहिणीचे अभिनंदन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |



 

मीना मंगेशकर खडिकर लिखित 'मोठी तिची सावली' या लताबाईंच्या जीवन चरित्राला अखिल भारतीय मराठी प्रकाशक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. गानसम्राज्ञी लताबाई मंगेशकर यांनी त्याबाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 

लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणाच्या मुहूर्तावर हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. या पुस्तकामध्ये मंगेशकर कुटुंबाच्या संघर्षाचा जीवनपट आहे. लहान माझी बाहुली मोठी तिची सावली ही कविता लहानपणी आपण आपल्या शाळेत ऐकली असेल त्याचप्रमाणे लताबाई त्यांच्या भावंडांसाठी कायमच एक आधारस्तंभ राहिल्या आहेत.

 

आज या पुस्तकाला इतका मानाचा सन्मान मिळाल्यामुळे भारतरत्न लता मंगेशकर यांना आपल्या बहिणीबद्दल प्रेम आणि अभिमान वाटणे साहजिकच. दीदींच्या जीवनातील चढउतार तितक्याच भावनिक दृष्टिकोनातून मांडणे ही कला मीना खडीकर यांना अवगत आहे असेच म्हणावे लागेल आणि त्यांच्या कष्टाची हा पुरस्कार ही पावती आहे असे म्हणायला हरकत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@