आलिया, कंगनाच्या वादात रणदीपची उडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |



 

इकडे रणदीप हुडाने आलियाची बाजू घेतली आणि दुसरीकडे याची झळ कंगना रणौतच्या बहिणीला पोचली. कंगना आणि आलियाच्या शीत युद्धात रणदीप हुडाने उडी घेताच कंगना रणौतची बहीण रंगोली चंदेल त्याच्यावर बरसली आणि त्यांचे सोशल मीडियावर घमासान झाले.
 
 
रणदीप हुडाने आलियाच्या आजच प्रदर्शित झालेल्या 'कलंक' या चित्रपटावर प्रतिक्रिया देताना, आलिया मला खूप आनंद होत आहे की तू सिने क्षेत्रातील काही कलाकार आणि क्रूर पीडितांच्या मताचा आपल्या कामावर परिणाम होऊ देत नाहीस. आणि असेच चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहेस हे कौतुकास पात्र आहे.
 
 
 
 
 
हे उपरोधात्मक वक्तवय कंगनाची बहीण रंगोलीला चांगलेच झोंबले. आलिया निदान तिच्या चमचेगीरीमुळे का होईना पण प्रसिद्ध आहे पण तू तर माझ्या बहिणीला 'उंगली' च्या सेटवर त्रास दिला तरी कोणी काही बोलले नाही असा आरोप तिने रणदीप हुडावर केला आहे. आता आलिया आणि कंगनाचे हे शीतयुद्ध कधी संपेल काय माहित. पण तोपर्यंत या छोट्या मोठ्या लढाया सुरूच राहतील अशी चिन्हे आहेत.
 
 
 
 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@