'जवानांना झोडून काढा' : तृणमुल आमदार रत्ना घोष यांचे संतापजनक विधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2019
Total Views |



कोलकाता : लोकसभा निवडणूकीत केवळ विरोध करण्यासाठी वाट्टेल ते विधान करणाऱ्या आणखी एका नेत्याचा व्हिडिओ उघडकीस आला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या महिला नेत्या आमदार रत्ना घोष यांनी संतापजनक विधान केले आहे. निवडणूकीच्या कर्तव्यावर असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानांना झाडूने झोडून काढा, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

आमदार घोष यांच्या या विधानावरून तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. चकदाह मतदार संघाच्या आमदार असलेल्या रत्न घोष हे यांचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी निवडणुकीच्या कर्तव्यावर असणाऱ्या जवानांना घाबरू नका, असे वादग्रस्त विधान केले आहे.



महिला मोर्चाच्या सदस्यांसमोर बोलताना त्या म्हणाल्या की, "लढाई जिंकायची असेल तर चांगलेवाईट असे काही बघितले जात नाही. लोकशाही किंवा लोकशाहीविरोधी तत्रांचा वापर करून आपल्याला जिंकावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. कोलकाता भाजपने या संदर्भातील व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

२०१६ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना झोडल्याचे मी पाहिले आहे. त्यावेळी हाणामारी झाली होती. मात्र आता त्यांनी आपल्याला रोखण्याचा प्रयत्न केला तर महिला कार्यकर्ता, नेता आणि अन्य कार्यकर्त्यांनी झाडू घेऊन त्यांना झोडून काढले पाहिजे, असे विधान त्यांनी केले आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@